15 Dec 2016


नमस्कार,

      आमच्या शाहू प्रतिष्ठान, कणकवली या संस्थेच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत. वैविध्यपुर्ण निसर्गाने नटलेल्या या कोकणभूमीत आमच्या संस्थेला भरपुर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. संस्था स्थापनेपासूनच समाजातल्या सर्वच स्तरांतल्या घटकांसाठी विविध उपयोगी कार्यास संस्थेनं वाहून घेतलेलं असल्यानं त्यासाठीच आम्ही आजही अगदी तळमळतेनं कार्य करत आहोत.

      आम्ही घेतलेला वसा निष्ठेनं निभावत असतांनां विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, मेळाव्यांच्या माध्यमातून इतरही संस्था, जसे की नेहरु युवा केंद्र, जन शिक्षण संस्थान, रोटरी क्लब, यांनी आम्हास वेळोवेळी खूप मदत केली त्याबद्यल त्यांचे मनपुर्वक आभार. स्थानिक स्तरांवर विविध कार्यक्रम राबवत असतांना विविध क्षेत्रातल्या मान्यवंराचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच लाभले ज्यामुळे संस्थेला अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळाली. या सर्व मान्सवरांचेही मनस्वी आभार.

      गेल्या दोनवर्षापासून संस्थेनं फोंडाघाट परिसरात वंडरलँड प्री स्कूल ही नाविन्यपुर्ण व आनंददायी शिक्षण देणारी एक पुर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. तिला अत्यंत उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नवनवनि संकल्पना राबवून मुलांना शिक्षणविषयक गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. याच प्रमाणे फोंडाघाट परिसरातच वंडरलँड स्पोर्टस अकॅडमी, वंडरलँड डान्स अकॅडमीयोग कार्यशाळा चालू करुन जास्तीत जास्त लोकांना योगसाधने बाबत जागृत करुन त्यांना योग या प्राचिन भारतीय विद्येचं महत्व पटवून दिले जात आहे. इतरही अनेक उपक्रमांचा सक्रिय सहभाग या ब्लॉगव्दारे आम्ही या ठिकाणी अपलब्ध करुन देत आहोत. संस्थेव्दारे राबवण्यात आलेल्या अनेक उपक्रमांस आजवर आपण सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला यापुढेही संस्थेव्दारे राबवल्या जाणा-या विधायक कार्यास आपला प्रतिसाद मिळावा हि अपेक्षा….


आपला

प्रा. डॉ. बालाजी आण्णासाहेब सुरवसे

संस्थापक अध्यक्ष, शाहू प्रतिष्ठाण कणकवली