शैक्षणिक


     बालवयापासून मुलांमध्ये कशी प्रगती असावी व शालेय अभ्यासक्रम मुलांना आनंदी वातावरणात हसतखेळत शिकवण्यासाठी संस्थेनं आनंददायी शिक्षण ही कार्यशाळा राबवण्यात आली. या उपक्रमास पालकांचा अत्यंत उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
      या बरोबरच शालेय जिवनात विविध स्तरांवर विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळया स्वरुपातील नैराश्य येत असते यामुळे विद्यार्थी मानसिक दृष्टया खचत असतो अशावेळी पालकांनी अपयशाच्या काळातही आपल्या पाल्यासोबत राहून त्याचा उत्साह कसा वाढवावा, मुलांचे प्रश्न कसे समजावून घ्यावेत याविषयी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श पालकत्व या विषयी कार्यशाळा आयोजित केली गेली.
      परिक्षा म्हटली की मुलांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते व या काळात ते मुल तणावग्रस्त असल्याचे भासते. पण चाचणी परिक्षा असो किंवा बोर्डाच्या परिक्षा असो अशा परिक्षा पुर्ण आत्मविष्वासाने सामोरे कसे जावे याविषयी मार्गदर्शनासाठी चर्चासत्र आयोजित केले गेले

No comments:

Post a Comment