पर्यावरण संरक्षण


      मानवाने त्याच्या गरजांचा वापर वाढवतांनाच निसर्गावरही अतिरिक्त ताण टाकला आहे. अनेक मानवी वापरातल्या वस्तू पर्यावरणासाठी घातक असून याकडे आपण सर्वच जण सर्रास दुर्लक्ष करतो. यामुळेच दिवसेंदिवस पर्यावरणचा –हास होत चाललेला असून याबाबीची आमच्या संस्थेनं गांभिर्याने दखल घेतलेली असून. यासाठी लहानसहान उपाययोजना अंमलांत आणल्या आहेत. प्लास्टीकच्या पिशवीला पर्याय म्हणून कागदी पिशवीचा वापर करावा यासाठी मार्गदर्शन चर्चासत्रे तर आयोजित केलीच पण घरगुती पध्दतीने या कागदी पिशव्या कश्या तयार कराव्यात यासाठी फोंडाघाट परिसरातील गांगोवाडी मध्ये याविषयी प्रशिक्ष्‍ण सत्राचे आयोजन करुन गृहिणींना पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
      झपाटयाने वाढणा-या शहरीकरणांमुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल केली जात असल्याणे पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. याबाबत केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने गंभिर दखल घेत मोठया प्रमाणवर वृक्ष लागवड करण्यासाठी लोकजागृती केली मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक सामाजिक संस्थांना वृक्षरोपन विषयांसंदर्भात आवाहन केले होते त्याप्रमाणे महाराष्ट शासनाने पर्यावरण सप्ताह आयोजित करुन या कालावधीत दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे उदिष्ट ठेवले होते. आपल्या संस्थेनंही या उपक्रमात सहभाग नोंदवत वंडरलॅड प्री स्कूलच्या बालविद्यार्थ्यांसह शालेय परिसरात वृक्ष लागवड केली.

No comments:

Post a Comment