सांस्कृतिक



    आपल्या भारतीय संस्कृतीचा व परंपरांचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. कोकण भूमीत वर्षभर येणारे सण व परंपरां आजही अगदी पारंपारीक पध्दतीनं उत्साहात साजरे केले जातात. आपल्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत असतांनांच त्यांना त्याविषयी सर्वंकष माहिती असवी व या माध्यमातनं संस्कृती संवर्धन व्हावं यासाठीच संस्थेच्या वंडरलॅंड प्री स्कूलमध्ये एकादशी,रक्षाबंधन, गुरुपौर्णिमा, ईद असे सण मुलांसह साजरे करुन त्यांच्या पालकांनाही यात सहभागी करुन घेतले गेले.
      अशा सण महापुरुषांच्या जयंत्यांच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करुन त्यांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केले गेले. ज्या समाजात आपण राहतो, वावरतो त्या समाजातील परंपरांची अननुभुती प्रत्यक्षात देण्याचा प्रयत्न संस्थेनं नेहमीच केला आहे.




No comments:

Post a Comment