क्रिडा

       सामाजिक क्षेत्राल विविध अंगांना स्पर्श करतांनाच संस्थेनं क्रिडा व साहसी खेळांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिसरातील खेळाडुंना विविध प्रकारच्या खेळांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन परिपुर्ण क्षेळाडू तयार करणे हे संस्थेचं एक दुरगामी स्वप्न आहे. त्यासाठीच संस्थेच्या स्तरावर आंतराष्टीय स्तरांवरील स्पर्धा, राष्टीय स्तरांवरील स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा, विभाग स्तरांवरील स्पर्धां मधील क्रिडा प्रकांरांची नियमावलीचा अभ्यास करुन त्या निकषांप्रमाणे काही क्रिडाप्रकांरांचे आयोजन केले गेले.       
      मातीतल्या रांगडया खेळांबरोबरच ट्रेकींग, स्वीमिंग, इ साहसी खेळांच्या वाढीसाठीही संस्था प्रयत्न करत असते. सुदैवाने संस्थेच्या कार्यक्षेत्रातच या खेळाच्या वाढीसाठीच्या पोषक गोष्टी डोंगरद-या, निसर्ग भ्रमंती, सागर दर्शन या बाबी उपलब्ध असल्यांनं आपसुकच संस्थेला हे साहसी कॅम्प आयोजित करण्याची संधी मिळाली.  
   

No comments:

Post a Comment