महिला सबलीकरण


      संस्थेनं केलेल्या विविध समाजपयोगी कार्यापैकी महिला सशकतीकरण व सबलीकरण यांविषयांत सर्वात जास्त व पुर्ण क्षमतेनं भरीव कार्य केलेले आहे. यात महिला बचतगटांची स्थापना तसेच फक्त स्थापना करुनच न थांबता त्या बचतगटांमार्फत विविध वस्तूंचे उत्पादन करुण घेणे. उत्पादित मालाची पॅकींग, गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शनतसेच उत्पादीत माल विक्री व्यवस्थापनांसंदर्भातही प्रशिक्षण देण्यात आले
      संस्थेच्या बचतगटांशिवाय परिसरातील इतर ही बचतगटांच्या उत्पादित मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला मेळावा व बचतगट उत्पादित मालाचे प्रदर्शनाचे आयोजन केले गेले. यापुढे जाऊन महिलांनी वेगवेगळे उद्योग करुन आपला उदरनिर्वाह करावा यासाठी शिवणकला, ब्युटी पार्लर, प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
      महिलांना व्यावसायिकदृष्टया सक्षम करत असतांनाच त्या मानसिक दृष्टयाही सक्षम असाव्यात म्हणून संस्थेतर्फे योग प्रशिक्षण शिबीर आयोजित केले गेले. या शिबीरास महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.


No comments:

Post a Comment